महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

(महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र)

प्रती,
आशोक चव्हाण साहेब,
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पक्ष



मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर घडलेली घटना दुर्दैवी होती आणी या घटनेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले याच पाश्र्वभूमीवर मुंबईत रेल्वे पुल व रेल्वे परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. रेल्वे मुख्यालयावर भव्य मोर्चा काढुन लोकशाही मार्गाने मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते निवेदन देऊन अनाधिकृत फेरीवाल्यांचा रेल्वेपरिसरातील विळखा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तसेच महापालिकांनासुद्धा यासंदर्भात निवेदन देण्यात आले पण झोपलेल्या सत्ताधाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही म्हणून नाईलाजाने मनसेला याविरोधात रस्त्यावर उतरावे लागले.
आपल्या पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपण यानी या अनाधिकृत फेरीवाल्यांना पपाठींबा दिला असुन ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन फेरीवाल्यांना भडकवण्याचे प्रयत्न संजय निरूपण यांच्याकडून केले जात आहेत आणी या चेतावणीखोर वक्तव्यामुळे काल मनसे पदाधिकारी  सुशांत मालवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. यानिमित्ताने आपन प्रदेशाध्यक्ष नात्याने आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी असे माझे मत आहे, एक तर काँग्रेस पक्षाने अनाधिकृत फेरीवाल्यांना जाहीर पाठींबा आहे द्यावा नाहीतर संजय निरूपम यांच्यावर पक्षीय कारवाई करण्यात यावी

     - राहुल पाटील शिंदे
जिल्हा उपाध्यक्ष मनसे, नांदेड

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात