​"आज सुशांत माळवदे, उद्या मी आणि परवा तुम्ही !" उत्तर भारतीय फेरीवाले मुंबईत 'कांग्रेसी क्रांती' घडवणार का ?

​"आज सुशांत माळवदे, उद्या मी आणि परवा तुम्ही !"
उत्तर भारतीय फेरीवाले मुंबईत 'कांग्रेसी क्रांती' घडवणार का ?




मालाड रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न करणारे मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यासह आणखी चार मनसे कार्यकर्त्यांवर ७० ते ८० फेरीवाल्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे आधी मालाडमधलं आणि त्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या ठिकठिकाणचं वातावरण तंग झालं. संजय निरुपमना 'करारा जवाब मिलेगा' असं म्हणत मनसैनिकांनी सोशल मीडियावर त्यांचा उद्धार करण्यास सुरुवात केली आहे.

एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की, हा जो हल्ला झाला तो संजय निरुपम यांनी इथे केलेल्या भाषणानंतरच झाला आहे. तीन दिवसांपूर्वी कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेरसुद्धा संजय निरुपम यांनी असंच चिथावणीखोर भाषण केलं होतं. कांदिवली आणि मालाड या दोन्ही भाषणांमध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पोलिसांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. आपल्या भाषणात मनसे कार्यकर्त्यांचा उल्लेख ते दरवेळी लुक्खे किंवा गुंड असा करतात आणि उत्तर भारतीय फेरीवाले त्यावर जोरजोरात टाळ्या मारतात. पण सर्वात आक्षेपार्ह टीका ते मुख्यमंत्र्यांवर करतात.












कांदिवलीप्रमाणे मालाडच्याही सभेत निरुपम मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणाले- "मेरी समझ में नहीं आता.. देवेंद्र फडणवीस.. यह आदमी है.. की औरत है.. की बीचवाला?"

मला नाही वाटत की, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आजवर एखाद्या कांग्रेस नेत्याने कधी टीका केली असेल.

याच सभेत फेरीवाल्यांना उद्देशून निरुपम म्हणाले की, "अगर पुलिसवाले मनसे के गुंडों को नही रोख सकते, अगर आपको मार खाने के लिए छोड देते हैं..तो आप लोगों को भी कानून हात में लेना पडेगा."

याच भाषणात उत्तर भारतीय फेरीवाल्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवताना संजय निरुपम यांनी इतिहासातील प्रतीक म्हणून मंगल पांडे यांचाही वापर केला. निरुपम म्हणाले, "मंगल पांडे के गाव के हों.. शर्म आनी चाहीए..और रोज मार खा रहे हों.."
तीन दिवसांपूर्वी कांदिवलीच्या सभेतही निरुपम म्हणाले होते, (मनसे आणि पोलिसांना उद्देशून) "जिनको आप कमजोर समझते हो, वो मंगल पांडे की औलाद है. इतना याद रखना."

मालाडच्या सभेचा समारोप करताना निरुपम म्हणाले, "अब (मनसे के) गुंडे आएंगे तब उन्हे छोडना नहीं.."
त्यांच्या भाषणातील ही वाक्यं मी इथे एवढ्यासाठीच दिली की, सुशांत माळवदेंवर झालेला हल्ला हा संजय निरुपम यांच्या चिथावणीमुळेच उत्तर भारतीय फेरीवाल्यांनी केला, हे सिद्ध व्हावं म्हणून.

आता दुसरा मुद्दा. हा मुद्दा जरा वेगळा आहे.

मालाडच्या भाषणात संजय निरुपम असं म्हणाले की, "ट्यूनिशियामधील क्रांती (अरब स्प्रिंग) ही फेरीवाल्यामुळे झाली. वारंवार हफ्ते मागणा-या अधिका-यांविरोधात एक फेरीवाला वैतागला आणि मग एकेक घटना घडत शेवटी तिथली पूर्ण सत्ता उलटली. यातूनच पुढे इजिप्त, लिबिया यांसारख्या अरब देशांमध्ये क्रांती झाली."

निरुपम यांच्या भाषणातला हा मुद्दा मी जेव्हा ऐकला तेव्हा मी हादरलोच.
हे तर फेरीवाल्यांना क्रांतीसाठीचं सरळ सरळ आवाहनच होतं-आहे.
पण मग ही क्रांती कोणाविरुद्ध ?
पालिका प्रशासनाविरुद्ध, पोलिसांविरुद्ध की मनसेविरुद्ध ?

ज्या ट्यूनिशियाचं उदाहरण संजय निरुपम यांनी दिलं, तिथे एका मोहंमद बुवजिजी नावाच्या एका तरुणाने (फेरीवाल्याने) भ्रष्टाचारी पोलिसांना कंटाळून स्वताला पेटवून घेतलं होतं. ही घटना तिथल्या राजकीय क्रांतीचं 'तात्कालिक कारण' ठरली. पण निरुपम यांनी मालाडच्या उत्तर भारतीय फेरीवाल्यांना अशी सांगितली जणू फेरीवाल्यांनीच ट्यूनिशियामध्ये क्रांती केली !

फेरीवाल्यांच्या क्रांतीचं मला काही माहीत नाही, पण मालाडमधल्या घटनेमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ठिणगी पेटली आहे, हे निश्चित.
मालाडच्या ज्या जान्हवी नर्सिंग होममध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर उपचार सुरु होते, तिथे जमलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकच गोष्ट सांगत होता- "आज सुशांत माळवदे आहे, उद्या मी आणि परवा तुम्ही ! आपण मराठी भूमिपुत्र म्हणून आता तरी जागे होणार आहोत ना ???

श्री. दर्पणराव दरेकर
मनसे पोलादपूर

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात