एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत एकुलती एक बहीण गमावलेल्या एका भावाचं राजसाहेबांना अभिनंदन पत्र

#एलफिन्स्टनचेंगराचेंगरीतएकुलतीएकबहीणगमावलेल्याएकाभावाचंराजसाहेबांनाअभिनंदनपत्र



नमस्कार साहेब,
माझं नाव राकेश वरपे आणि बहीणीचं नाव श्रद्धा वरपे. आज त्या घटनेला १ महीना पूर्ण होत आहे. जसे हळू हळू दिवस पुढे सरकत आहेत तशी तिची आठवण आणखीन दृढ होत आहे साहेब. ती गेल्याने आमच्या कुटुंबावर जी परिस्थिती ओढावली आहे साहेब, ज्याची कल्पना सुद्धा थरकाप उडवणारी आहे. तिच्या असण्याने घरी हास्याचे व आनंददायी वातावरण आम्हांला मिळत होते, अशी ती अचानक निघून जाणे हे फार भितीदायक आहे. आपण म्हणतो की, दसरा आणि दिवाळीत लक्ष्मीचे आगमन होते, पण ऐन याच दसरा आणि दिवाळीत घरातली लक्ष्मी कायमची अदृश्य होणे, ही त्याहूनही न पचणारी व्यथा आहे. घरात आणि घराबाहेर ज्या पद्धतीने तिने नाते व हितसंबंध जपले तिच्याबद्दलच अशी अचानक घटना घडणे, जी फक्त जाणीवा मेलेल्या लोकांमुळे, ही न पचणारी घटना आहे. घटनेच्या आधल्या दिवशी ती आईला दवाखान्यात घेऊन जाते आणि घटना होण्याच्या ५-६ मिनिटं अगोदर ती पप्पांना पुढे जायला सांगते. तिची ही जातानाची गोड आठवण मरेपर्यंत आमच्यासाठी स्फूर्ती देणारी आहे. सर्वात जास्त वाईट आणि यातना याच गोष्टीतून होतात की एक नाजूक व जीवंत मन अश्या असंवेदनशील चालत्या-फिरत्या प्रेतांच्या कचाट्यात अडकलं होतं.

साहेब, आता आमच्या कुटुंबाची केवळ एकच इच्छा आहे की माणसांकडूनच घडवलेल्या (रेल्वे प्रशासन, राज्य सरकार, अफवा पसरवणारे आणि ऐनवेळी मोबाईल हातात घेऊन व्हिडीओ करणारे व जिवंत प्रेतांसारखे वागणारे सर्वसामान्य ) या घटनेत जी २३ व्यक्ती सोडून गेलेत आणि ज्या प्रकारचा प्रसंग आज आमच्यावर ओढवला आहे, यापुढे अशी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये.

साहेब, या इच्छेलाच दुजोरा म्हणून आपण ज्या पद्धतीने लोकांचा आणि विशेष म्हणजे आमच्या सारख्या २३ कुटुंबांचा राग व्यक्त केलात, एक जन आंदोलन उभे केले आणि शेवटपर्यंत तडीस नेले, यशस्वी केले, (महत्वाचे म्हणजे झोपलेल्यांना जागे केलेत) याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन !

माझ्या बहीनीची मनापासून इच्छा होती आणि आमचीही आहे की हे राज्य आपल्या हाती लवकर यावे. बाळासाहेबा नंतर आपल्या लोकांबद्दलची तळमळ ही फक्त तुमच्याच ठिकाणी आम्हाला प्रकर्षाने जाणवते. ज्या दिवशी आपली लोकं अभिमानाने हे राज्य तुमच्या हाती देतील, त्या दिवसापासून परिस्थिती तुम्ही मुळापासून सुधाराल आणि भ्रष्ट लोकांना वठणीवर आणाल, हे नक्की आणि आम्हालाही तिची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल.

#पुन्हा_अभिनंदन

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात